- मोशी, रावेत, किवळे व मामुर्डी परिसत बांधकामे निष्कासनाची मोठी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने मोशी व रावेत, किवळे, मामुर्डी परिसत बांधकामे निष्कासनाची कारवाई केली.
मोशीतील टी.पी. रस्त्याने बाधित ०४ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. यात एकूण क्षेत्रफळ अंदाजे ५६६.०० चौ. मी. बांधकाम पाडण्यात आली. कारवाईसाठी अतिरिक्त आयुक्त – २ अजित पवार, सह शहर अभियंता मकरंद निकम यांचे मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे नियत्रंणात उपअभियंता हेमंत देसाई, २१ कनिष्ठ अभियंता व ०२ बीट ऑफीसर तसेच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थीतीत कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी १ पोकलेन, ०१ जेसीबी १० मजूर, १ महापालिकेचा इ क्षेत्रिय अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
रावेत परिसरात आठ पत्राशेड, किवळेत ९ आरसीसी व मामुर्डीत २ आरसीसी बांधकामे पाडण्यात आली. यात आरसीसी १०९६, ११७९३ व पत्राशेड ४००० स्क्वे. फुट बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३ जेसीबी, १ ट्रक, २ कम्प्रेसर, ६० पोलीस, २० लेबर, १५ सहकारी, जेई २, डीई १, इइ १ यांचा समावेश होता.