न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत, थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांनी अज्ञान आणि अंधश्रध्दा निर्मुलनासाठी केलेल्या महान कार्याचा वारसा आजच्या पिढीने जोपासावा, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संत गाडगेबाबा यांचे जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस महापौर माई ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर केशव घोळवे,सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उल्हास जगताप, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, समाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, भाई विशाल जाधव आदी उपस्थित होते.