- महाराजांचे गड-किल्ले अप्रतिम देणगी; मावळ्यांकडून संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने नुकतीच ‘तिकोना’ गडावर साफसफाईची मोहिम आयोजित करण्यात आली होती. उपस्थितांनी गडावरील कचरा, प्लॅस्टिक बॉटल एकत्र गोळा करून, त्याची योग्य विल्हेवाट लावली.
महाराजांचे गड-किल्ले महाराजांनी आपल्याला दिलेली अप्रतिम देणगी आहे. त्याची निगा राखणे हे आपले कर्तव्य आहे, असा संदेश जिजाऊ प्रतिष्ठाने आपल्या मावळ्यांना यावेळी दिला.
या मोहिमेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल दाभाडे, कार्यकारी अध्यक्ष महेश ढवळे, खजिनदार अंजली कडेपवार, तुलसी कडेपवार, शुभम कडेपवार आदी सहभागी झाले होते.