- आज २०४ जणांना बाधा; एकाचा मृत्यू तर, २५१ जणांना डिश्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २३ फेब्रुवारी) रोजी २०४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – दिघी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०३६२५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९८६१३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८३२ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या जाहीर केली आहे. अ – १६, ब – ३१, क – २३, ड – ३९, इ – १६, फ – १६, ग – २७, ह – ३६ = एकुण – २०४.