- वाहनांखाली येऊन जीव देण्याचाही प्रयत्न; भोसरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२१) :- विनामास्क दुचाकीवरून फिरणाऱ्या एकाला वाहतूक पोलिसांनी अडवले. त्यावरून वाहतूक पोलीसासोबत हुज्जत घालून दुचाकीस्वाराने रस्त्यावरच गोंधळ घातला. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांखाली येऊन तो जीव देण्याचा प्रयत्न करू लागला.
त्याला पोलीस ठाण्यात आणले असता तिथेही त्याने डोके आपटून खिडकीची काच फोडली आणि फुटलेली काच घेऊन पोलिसांच्या अंगावर धावला. याबाबत दुचाकी चालक तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 23) दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडला.
विकी अरविंद बागुल (वय २५, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार राजीव रणदिवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.