- पक्षनेतृत्वाने मागितला खुलासा; अन्यथा गटनेतेपद धोक्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- स्थायी समिती सदस्यपद निवडीत पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याने पालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांना शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी नोटीस दिली आहे. आठ दिवसांत खुलासा मागविला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसाठी शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, गटनेते कलाटे यांनी पक्षाचा आदेश डावलून मीनल यादव यांचे नाव दिले.
कलाटे यांनी पक्ष आदेशाचा भंग केला. याविषयी खुलासा न केल्यास पक्षातर्फे योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. याविषयी कलाटे म्हणाले, याबाबत मला अद्याप कोणतेही पत्र मिळालेले नाही. पत्र मिळाल्यानंतर मी पक्षश्रेष्ठींकडे माझी भूमिका सांगेल. आदेश पाळला जाईल.