- प्रधानमंत्री आवास योजनेच्या सोडतीला शनिवारचा मुहूर्त..
- लाभार्थ्यांना सोडतीच्या ठिकाणी मज्जाव; ऑनलाईन उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- राजकीय मानापमान नाट्यानंतर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रोटोकॉलचे पालन करीत मागील महिन्यात रद्द केलेली सोडत होणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चहोली, रावेत व बो-हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सोडत शनिवारी सकाळी ११ ला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत.
महापालिका सभेने दि. २६ फेब्रुवारी २०२० ला मान्यता दिली होती. दि. १७ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर २०२० या कालावधीत नागरिकांकडन अर्ज मागविले आहेत. या योजनेकरिता एकूण ४७ हजार ८७८ इतके अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ४७ हजार ७०७ अर्ज पात्र ठरलेले आहेत. प्रकल्पाच्या अंतर्गतच चऱ्होली -१४४२, रावेत- ९३४ व बो-हाडेवाडी -१२८८ अशा एकूण ३६६४ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या योजनेकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण असेल.
महापौर उषा ढोरे म्हणाले, सोडत पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पेजवर दाखविण्यात येणार असल्याने नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून उपस्थित न राहता वरीलप्रमाणे दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन उपस्थित राहावे.
सत्तारूढ़ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, आवास योजनेकरिता ३६६४ सदनिकेची निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे.