- इमारतीसाठी फर्निचर नाममात्र दरात देण्यास स्थायीची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी, मोरवाडी येथील न्यायालयाचे तात्पुरते स्थलांतर अण्णासाहेब मगर स्टेडियमसमोरील इमारतीत होणार आहे. दरम्यान, या इमारतीसाठी फर्निचरसह नाममात्र दरात न्यायालयास देण्यास स्थायी समितीच्या बैठकीस मान्यता मिळाली.
या इमारतीसाठी ८ लाख ७७ हजार जागेचे भाडे व ४ लाख २६ हजार फर्निचर या प्रमाणे एकूण १३ लाख ३ हजार आकारणी करण्यात आली होती. मात्र, पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या माध्यमातून फर्निचरसह भाडे देण्यास महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने असमर्थता व्यक्त केल्याचे महापालिकेस कळविण्यात आले होते.
दरम्यान, शहरातील वाढती लोकसंख्या व न्यायालयायाची गरज लक्षात घेता, महापालिकेच्यावतीने फर्निचर करुन देण्यास व सार्वजनिक बांधकामच्या वतीने ठरविण्यात आलेले तसेच, न्यायालयाने मान्य केलेल्या ८ लाख ७७ हजार भाडे आकारण्यास स्थायीने मान्यता दिली आहे.