न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- सांगुर्डी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वसंत सुदाम भसे यांनी नयन स्वप्रिल भसे यांचा, तर उपसरपंचपदी सोनम सुदाम भसे यांनी संगीता सुदाम भसे यांचा पराभव करत एका मताने विजय मिळविला.
सांगुर्डी ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य आहेत. वसंत सुदाम भसे व नयन स्वपिल भसे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. उपसरपंचपदासाठी सोनम सुदाम भसे व संगीता शरद भसे यांनी आपले अर्ज दाखल केले. दुपारी अजांची छाननी करण्यात आली.
यात सरपंचपदाचे दोन्ही व उपसरपंचपदाचे दोन्ही अर्ज वैध ठरले. त्यानंतर गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये सरपंचपदासाठी वसंत सुदाम भसे यांना ४ व नयन भसे यांना ३ मते मिळाली. त्यामुळे भसे हे एक मताने विजयी झाले. उपसरपंचपदासाठी सोमन सुदाम भसे यांना ४ तर, संगीता शरद भसे यांना ३ मते मिळाली. एका मताने संगीता भसे यांचा पराभव करून सोनम भसे यांची उपसरपंचपदावर निवड झाली.