न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहर तिळवण (तेली) समाजाचे अध्यक्ष, उद्योजक दिलीप भिकाजी चिलेकर (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे. संताजी महाराज जगनाडे प्रतिष्ठान, वधू-वर सूचक मंडळ आदी संस्थांचे ते आधारस्तंभ होते.


















