न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कांबळे, गोरोबा गुजर, प्रल्हाद कांबळे, सुदाम कांबळे, दत्तात्रय कांबळे आदी उपस्थित होते.


















