- पिडीत महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- आरोपी हा फिर्यादी महिलेच्या सावत्र आईचा नातेवाईक आहे. आरोपी व फिर्यादी २०१७ ते २४ डिसेंबर २०२० या कालावधीत किवळे याठिकाणी एकत्र रहायला होते. याकाळात आरोपीने फिर्यादी महिलेला धमकावत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले.
दरम्यान, २४ डिसेंबर २०२० रोजी मुलीची तब्येत खराब झाल्याने तिला पाहण्यासाठी फिर्यादी महिला आपल्या मुळ गावी गेली. आरोपी महिलेच्या गावी पोहचला व ‘तू माझ्या सोबत आली नाहीस तर तुझा बदनामी करणारा व्हिडिओ प्रसारित करेन’ तसेच, ‘तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन’ अशी धमकी दिली.
आरोपीने फिर्यादी महिलेचा बदनामी करणारा व्हिडिओ तयार करून महिलेच्या नातेवाईकांना पाठवला. तसेच, महिलेविषयी बदनामी करणारा संदेश लिहून तिच्या घराजवळ चिकटवला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. किवळे, ता. हवेली याठिकाणी हि घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पिडित महिलेनं देहूरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २६) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अमोल दिलीप नांगरे (रा. कामेरी, ता. वाळवा, सांगली) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.