- महिला पोलिसांच्या ताब्यात; मोरवाडीतील घटना…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- मोरवाडी येथे रिक्षात एक पुरुष जातीचे नवजात अर्भक कोणीतरी टाकून दिले असल्याचे शनिवारी सकाळी सात ते आठच्या दरम्यान काही नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
त्यानंतर पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अर्भकाला ताब्यात घेऊन वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोरवाडी परिसरात पोलिसांनी तपास केला. एक महिला गरोदर होती, अशी माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी कसून शोध घेत संबंधित महिलेला चाैकशीसाठी ताब्यात घेतले.
बाळाला आपणच जन्म देऊन रिक्षात टाकून दिले, असे महिलेने पोलिसांना सांगितले. हा प्रकार नेमका का केला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.