- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आदेश…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘गुंडा स्कॉड’ सुरू करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील सर्वच टोळ्यांची मुस्कटदाबी करण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी गुंडा स्कॉड सुरू करण्यात आले आहे.
भयमुक्त समाजासाठी गुंडा स्कॉडची निर्मिती करण्यात आली आहे. हे स्कॉड शहारातील छोट्या मोठ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन राहील. तसेच, शहरात गुन्हेगारीचे ओंगळवाणे प्रदर्शन होणार नाही याची खबरदारी घेतील.
याव्यतिरिक्त तरुणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याची मोठी जबाबदारी स्कॉडवर राहणार आहे.’ हे स्कॉड शहारातील छोट्या मोठ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन राहील. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकतेच याबाबतचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली.