न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. २८ फेब्रुवारी) रोजी ४२३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हा ०१ पुरुष चिंचवड (७१) येथील रहिवासी आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०५७०४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०००३९२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८४२ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पालिकेने आज बाधित पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या जाहीर केली आहे. अ ५१, ब ७८, क ४१, ड ५६, इ ६४, फ ५१, ग ३६, ह ४६ एकूण ४२३.


















