- वाकडमधील द वूडस व नोबल पॉलरिचार्ड संस्थांवर फसवणुकीचा गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२१) :- गुंतवणुकीवर चांगला मोबदला देण्याचे सांगून काही कालावधीपर्यंत ठराविक रकमेचे व्याज दिले. त्यातून विश्वास संपादन करून आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडून १७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. द वूडस वाकड, काळेवाडी येथे ४ जून २०१३ पासून २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
सुवर्ण सिद्धी इंकस्टमेंट द वूड्स, वाकड काळेवाडी सर्कल जवळ, कार्यालय क्रमांक सात, पुणे वृषाली प्रवीण कानडे (रा. कळंब, ता. आंबेगाव, जि. पुणे), नोबल पॉलरिचार्ड ज द इस वाकड काळेवाडी सर्कल जवळ, कार्यालय क्रमांक सात, पुणे अ यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात लहू मनोहर भुजबळ (वय ५४, रा. वाकड गावठाण) यानी फिर्याद दिली आहे. लहु भुजबळ आणि त्यांच्या पत्नी ज्योती लहूल भुजबळ (वय ५४, रा. वाकड गावठाण) यांना आर्थिक गुंतवणुकीतून चांगला मोबदला मिळेल, असे आमिष दाखवले. १८ जुलै २०१३ पासून १९ जानेवारी २०१७ या कालावधीत गुंतवलेल्या काही रकमेचे व्याज देऊन आरोपींनी आणखी आर्थिक गुंतवणूक करण्यास दोघांना भाग पाडले. गुंतवणुकीवर तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी लहू भुजबळ यांच्या चार लाख ७५ हजार आणि त्यांची पत्नी ज्योती भुजबळ यांच्या एक लाख ५० हजार, असा एकूण सहा लाख २५ हजार रुपयांचा अपहार केला. त्यांना त्यांची मुद्दल आणि व्याज परत न करता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुस-या प्रकरणात भालचंद्र भिकाजी खोले (वय ६८. रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. भालचंद्र खोले आणि त्यांच्या पत्नीला देखील आरोपींनी आमिष दाखवून विश्वास संपादन करून आर्थिक गुतवणूक करण्यास भाग पाडले. भालचंद्र यांनी १० लाख ५० हजार तर त्यांच्या पत्नीने एक लाख रुपये गुंतवणूक केली. त्या रकमेचा आरोपींनी अपहार केला. दोन्ही प्रकरणात आरोपींनी एकूण १७ लाख ७५ हजार रुपयाचा अपहार करून फसवणूक केली आहे.