- भोसरीतील लांडेवाडीत एकाची दहशत; वाहनाचेही केले मोठे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२१) :- भोसरीतील लांडेवाडी येथे रविवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी त्याच्या दुचाकी जवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी कोयता घेऊन आला. त्याने फिर्यादी यांची कॉलर धरून शिवीगाळ करत ‘तुला मारून टाकतो’ अशी धमकी देऊन कोयता जोरात फिरवला. दरम्यान फिर्यादी यांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या दुचाकीवर कोयत्याने जोरात मारून दुचाकीचे मोठे नुकसान केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या वस्तीतील अन्य नऊ दुचाकी वाहनांवर देखील कोयत्याने मारुन नुकसान केले. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करून वस्तीत दहशत निर्माण केली.
गणेश नामदेव कांबळे (वय २१, रा आंबेडकर नगर, लांडेवाडी, भोसरी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कपिल नंदू (वय १९, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी), याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.