- शहर कॉंग्रेसच्या कारभाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांसोबत आढावा बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२१) :- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. मंगळवार, दि. ९ मार्च २०२१ रोजी दुपारी १ वाजता गांधीभवन तन्ना हाऊस, मॅजेस्टिक कामगार निवासच्या मागे, रिगल सिनेमाजवळ, कुलाबा मुंबई येथे ही बैठक होणार आहे.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी, माजी खासदार, आमदार, मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार, सर्व ब्लॉकचे अध्यक्ष, सर्व आघाडी संघटनांचे जिल्हाध्यक्ष तसेच सर्व विभाग व सेलचे जिल्हाध्यक्ष यांनीच उपस्थित रहावे.
तसेच राज्य सरकारने कोरोना कोविड-१९ विषयी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


















