- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा मोठ्या कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२१) :- तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजानन मारणे याची साथीदारांनी जंगी मिरवणूक काढत द्रुतगतीमार्गावर एकच जल्लोष केला होता. द्रुतगतीमार्गावरील उर्से टोल नाका येथे टोल न भरता मारणे आणि त्याचे साथीदार निघून गेले. याप्रकरणी त्याच्यासह इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, फूड मॉल येथे फुकटात बळजबरी आणि मारहाण करून वडापाव, सँडविच आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन गेल्याचं निदर्शनास आले आहे. त्यानुसार याप्रकरणी त्याच्यासह साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं. तसेच गजा मारणे याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत ३६ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून १४ आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर, मारणे याच्यावर या प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. दोन्ही गुन्हे हे शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.


















