न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसें.) :- केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या १५ लाख रूपयांच्या वक्तव्याचा शिवसेना तिरोडा-गोरेगाव विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी चांगलाच समाचार घेतला असून, मंत्री मोहदय रामदास आठवले यांचे वक्तव्य म्हणचे डिसेंबरमध्येच एप्रिल फुल करण्यासारखे आहे, असा टोलाही दाखले यांनी आठवलेंना लगावला आहे.
विदेशातुन काळा पैसा आणुन प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आमिष मोदी सरकारने जनतेला दाखवले होते. हा चुनावी जुमला होता. त्यामुळे जनतेने हे विसरूनच जावे, या भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेला आपल्या खिशातील पैसे वाचवणे देखील आता मुश्कील झाले आहे.
त्यात आता आरबीआयच्या राखीव निधिवरही मोदी सरकारची नजर आहे. झोळी फ़ैलावणारे, भिक्षा मागून जगणारे हे सरकार व त्यात प्रकांड पंडित रामदास आठवले यांना अशा वेळी मात्र बाष्कळ गप्पा मारण्याचे बरे आठवते, अशी खोचक व खरमरीत टीकाही दाखले यांनी यावेळी केली आहे.










