न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माहिती व जनसंपर्क आणि पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी राजीनामा दिला आहे. महापालिकेत रुजू झाल्यानंतर महिन्याभराच्या आतच दुर्वास यांनी राजीनामा दिला.
२२ फेब्रुवारी रोजी त्यांनी राज्य सरकारकडे राजीनामा सुपूर्द केला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
याबाबत दुर्वास यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.


















