- शुक्रवारी मिळणार स्थायी समितीला नवा अध्यक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२१) :- पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार उद्या (मंगळवारी) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. ५ मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. त्यामुळे स्थायीचा नवा कारभारी कोण हे लवकरच कळणार आहे.


















