- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उद्या युवक पदनियुक्ती कार्यक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक पदनियुक्तीचा कार्यक्रम उद्या मंगळवार दि. ०२ मार्च रोजी दुपारी ३.०० वा. चिंचवड स्टेशन येथील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, संजोग वाघेरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विरोधी पक्ष नेते राजु मिसाळ आदी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी युवक पिंपरी – चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने युवक संघटना अधिक मजबुत करण्यासाठी नविन पदनियुक्त्या करण्यात येणार आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका दृष्टिक्षेपात ठेऊन युवक संघटनेला बळकटी देण्यासाठी शहर, विधानसभा आणि प्रभाग नियुक्त्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष विशाल वाकड़कर यांनी दिली.


















