- येत्या आठ दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करा – जितेंद्र ननावरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- महात्मा फुलेनगर येथे सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असून, सारख्या फेस जात आहे. महात्मा फुलेनगर येथील लोकसंख्या प्रचंड वाढली असून, जेवढी मागणी आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने कमी प्रमाणात वीज पुरवठा महावितरणाकडून होत आहे. याबाबत माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी भोसरीतील एम.एस.ई.डी.सी.एल. चे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, महात्मा फुलेनगर येथील वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत मी अनेकदा पत्रव्यवहार विभागाला केला असून, या बाबतीत काहीच कारवाई झाली नाही. आत्ता कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाइन होत असून त्यांना वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. वीज पुरवठा सारखा खंडित होत असल्याने त्यांच्या वर्षाच्या अभ्यासक्रमावर तसेच परीक्षेवर परिणाम होणार असून याचा प्रचंड त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.
शिवाय या ठिकाणी अतिरिक्त एक ट्रांसफार्मर बसवणे बाबत मागणी केली आहे. एक्स्ट्रा पोल बसवणे, अंडरग्राउंड वीज वाहिनी बसवणे बाबतीत कितीतरी वेगळा मागणी करूनसुद्धा याच्यावर काही एक निर्णय झालेला नाही. वीज बंद-चालूचा खेळ चालू असल्याने महात्मा फुलेनगर मधील जनता प्रचंड प्रमाणात त्रस्त झालेली आहे. ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. शिवाय महावितरणचा कारभार आंधळं दळतं कुत्र पिठ खाते असं झालेला आहे. रीडिंग प्रमाणे बिल येत नाहीत, सरासरी बिल पाठवून लोकांना वापरापेक्षा कितीतरी प्रमाणात पटीने जास्त बिलं दिल्याचा प्रकार फुलेनगरमध्ये चालू आहे. वारंवार वायर तुटने, वारंवार वायर जळणे अशा प्रकारामुळे जनतेचा जीव धोक्यात येत असल्याचा प्रकार फुलेनगरमध्ये चालू आहे.
अनेक पोल कुजून पडण्याच्या मार्गावर आहेत. वायर कितीतरी जुन्या व जीर्ण झालेल्या आहेत. यामध्ये जीवितहानी झाल्यास पुर्णपणे महावितरण अधिकारी जबाबदार असेल. महावितरणच्या या प्रकाराकडे लक्ष नसून अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार या ठिकाणी सुरू असल्याचे दिसते. येत्या आठ दिवसात नवीन ट्रांसफार्मर, लोड डिव्हाईड करण्यासाठी नवीन पॉल व अंडरग्राउंड विद्युत वाहिनीचे काम सुरु करावे. अन्यथा शिवसेनेच्या व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे या निवेदनात ननावरे यांनी म्हटले आहे.


















