- शहरात आज ४८३ जणांना बाधा; तर, १५५ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ३ मार्च) रोजी ४८३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीतील व बाहेरील एकाचाही आज कोरोनाने मृत्यू झालेला नाही. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०६७२८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०११०० वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८५० जणांचा मृत्यू झालेला आहे. आज प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ ५१, ब १०१, क ५०, ड ६८, इ ५९, फ ६०, ग ४१, ह ४७ एकूण ४८३ अशी आहे.


















