- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत प्लॉटींगवर वरवंटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत दिघीतील गणेशनगर येथे आज बुधवारी (दि. ०३) रोजी मंजूर विकास योजनेतील रेड झोनने बाधित असलेल्या क्षेत्रातील चालू असलेले अनधिकृत भू-रेखांकन विकास क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये दिघी गणेशनगर, ग.नं. ७६ येथील अनधिकृत भू-रेखांकन व विकास (अनधिकृत प्लॉटींग) असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ७.०००.०० चौ.मी. (७५.३२० चौ.फूट) काढून टाकण्यात आले.
ही कारवाई अतिरीक्त आयुक्त २ व सह शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे- उप.अभियंता हेमंत देसाई तसेच कनिष्ठ अभियंता के.ए.मगर, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक यांच्या सोबत महापालिका अतिक्रमण पथक, दिघी येथील स्थानिक पोलीस पी.एस.आय, पोलीस पुरुष -१०, पोलीस महिला ६, मजूर -१५, जे.सी.बी. – २. डंपर २, नेकर -२ यांच्या उपस्थितीत करण्यात आली.


















