न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पिंपळे गुरव परिसरात विनापरवाना भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत करण्यात आली.
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक, डायनासोर पार्कसमोरील विनापरवाना हातगाड्या जप्त करण्यात आल्या. परिसरातील सृष्टी चौक, बीआरटी रस्ता, कोकणे चौक, गजेबो हॉटेल ते तुळजा भवानी मंदिर, साठ फुटी रस्ता, बँक ऑफ महाराष्ट्र परिसर आदी परिसरात अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली.
फूटपाथवर गर्दी करून भाजीविक्री करणाच्या विक्रेत्यांना भाजीविक्री करण्यास मनाई करण्यात आली. येथील पदपथावर पायी चालणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करीत असलेले दुकानदार व्यावसायिकांचे जाहिरात स्टॅन्ड, बोर्ड जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेली सामग्री ‘ ड’ क्षेत्रीय कार्यालयात जमा करण्यात आले आहे.












