- अनधिकृत बांधकामांभोवती आवळला फास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागने प्राधिकरणातील अथर्व पार्क परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तीन जेसीबी, पोकलेन व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई करून जवळपास ४००० चौरस फूट बांधकाम उध्वस्त केले.
शिवाजी पार्क येथील परिसरात अनेक नागरिकांनी वाढीव बांधकामे करून खोल्या विकणे आणि भाड्याने दिल्या आहेत. या भागात हा एक प्रकारे धंदा झाला आहे.
परिसरातील प्राधिकरणाचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने बांधण्यात आलेल्या दोन मजली इमारती जमीनदोस्त केल्या. या परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी व ब्रेकरच्या साहाय्याने चिंचवड पोलीस स्टेशनचे अधिकारी, जवळपास ५० हून अधिक पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात कारवाई केली.












