- आर्थिक पिळवणूक करून मानसिक व शारीरिक छळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- तुझ्या घरच्यांनी लग्नामध्ये आमचा मान-सन्मान केला नाही, असे म्हणून आरोपींनी पीडित विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच क्रूर वागणूक देऊन, आर्थिक पिळवणूक करून मानसिक व शारीरिक छळ केला. यात तिचा गर्भपात झाला.
आरोपी पती हा १२ फेब्रुवारी २०२१ रोजी एका महिलेला सोबत घेऊन आला. या महिलेला मी घरात घेणार आहे, असे आरोपी पती म्हणाला. त्याला फिर्यादी विवाहितेने विरोध केला. त्यावरून आरोपी पतीने त्यांना मारहाण केली. तसेच आरोपी सासू व नणंद यांनी शिवीगाळ केली.
वेताळनगर येथे सप्टेंबर २०२० ते ३ मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.