- १७ वर्षीय मुलीसह तिघा-चौघांना बेदम मारहाण; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- पिंपळे साैदागर येथील लिनियर गार्डनमध्ये फिर्यादी आणि त्यांचे कराटे क्लासमधील मित्र प्रॅक्टिस करत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले असता त्यांना हकलून दिले. त्याचा आरोपींना राग आला. त्यांनी त्यांच्या पाच ते सहा मित्रांना बोलावून घेतले.
त्यानंतर फिर्यादी यांचे प्रशिक्षक यांना शिवीगाळ केली. गेटच्या बाहेर आले की, कापून टाकीन, अशी धमकीही दिली. तसेच १७ वर्षीय मुलीला दगड मारून जखमी केले. त्याचप्रमाणे एकाला हाताने मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. २) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
दीपाली नागेश डोणे (वय ३१, रा. शिवार गार्डन हाॅटेलच्या पाठीमागे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवराम केशव फुलारे (वय २१, रा. रहाटणी चाैक) व अभिषेक अनिल चव्हाण (वय २०, रा. रहाटणी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह संतोष फुलारे (रा. पिंपळे साैदागर) व पाच ते सहा अनोळखी मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे फिर्यादी नमूद केले आहे.
















