- अटकेनंतर आता थेट तडीपारीची कारवाई; पोलिसांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवराज दाखले नामक व्यक्तीला पुण्यातील वाकड पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या होत्या.
आता त्याच्यावर थेट तडीपारीची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीला खोटं आश्वासन देऊन त्याच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवले होते’, असा वादग्रस्त आरोप युवराज दाखलेने केले होते. यावरून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यावरून अजित पवारांनी विधानसभेतच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं.
















