- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनीत इलेक्ट्रिकल कंट्रोल युनिट व कॉपर वायर चोरून नेताना चोरटा सापडला. जे ब्लॉक मधील १३ नंबर लाईनमधून इलेक्ट्रिकल कंट्रोल युनिटचे १६ पार्ट आणि कॉपर वायरचे ५०० नग असा एकूण एक लाख २३ हजार ६७२ रुपयांचा ऐवज चोरून नेण्याचा कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने प्रयत्न केला.
कंपनीच्या परस्पर हे कृत्य केल्याने याबाबत घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सयाजी लालासाहेब पवार (वय ५५, रा. चिंचवड) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा शामराव नारखेडे (रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी कंपनीत घडली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















