- आरोपीकडून पोलिसाच्या अंगावर वाहन घालून ठार मारण्याचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाने वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेवाडीत अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ही बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या ‘ आशीर्वाद सायबर कॅफेवर ” छापा टाकुन कारवाई केली.
पोलीस आयुक्त यांच्या सुचनेनुसार व पो. नि. विठ्ठल कुबडे यांनी त्यांचे सामाजिक सुरक्षा पथकातील पो उप नि प्रदिपसींग सिसोदे व पो उप नि धैर्यशिल सोळंके तसेच पथकातील पोलीस अमलदार यांच्या वेगवेगळया दोन टीम तयार करुन व स्वतः टिमचे नेतृत्व करुन योजना आखली त्याप्रमाणे ज्योतिबानगर, काळेवाडी, वाकड या ठिकाणी दिनांक ०४/०३/२०२१ रोजी रात्री २०:१५ वाजता सापळा रचुन छापा टाकला. आरोपी राहुल प्रसाद गोंड, वय २३ वर्षे हा संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करताना मिळुन आला. आरोपी राहुल गौड याच्या ताब्यातील संगणकाची व त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता त्याचे इतर साथीदार हे व्हॉट्सअॅपद्वारे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्याचे मोबाईलवर माहिती पाठवित होते त्या माहितीच्या आधारे त्याचेकडे असलेल्या संगणकावर बनावट नाव, दिनांक, शिक्के, सिरीयल क्रमांक व फोटो हे तयार करुन नंतर त्याची प्रिंट काढत असे व त्यावर त्याचेजवळ असलेले बनावट शिक्के मारुन कलर प्रिंटर व झेरॉक्स मशिनच्या साहाय्याने त्याची कलर झेरॉक्स प्रिंट काढुन ती प्रिंट स्वतःच्या मोबाईल व्हॉट्सअपद्वारे त्याचे इतर साथीदारांना पाठवुन त्यांचेकडुन मोबदल्यात गुगल पे द्वारे व रोख रक्कमेस्वरुपात पैसे स्विकारुन नंतर पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने संगणक व मोबाईल मधील माहिती डिलीट करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आरोपी राहुल गोंड, वय ३३ वर्षे, रा. रुपीनगर, निगडी हा आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्श्युरन्स, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रांमध्ये नाव, दिनांक, सिरीयल क्रमांक, फोटो, शिक्का यामध्ये बदल करुन, बनावट दस्तऐवज तयार करुन त्यावर बनावट शिक्के मारुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी शासनाची फसवणुक करताना मिळुन आला. आरोपी राहुल गोंड याच्या ताब्यातुन ३,८८० रोख रक्कम, १,१०,४०० / – रु किं चे बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य (संगणक, प्रिंटर, पेन ड्राईव्ह, झेरॉक्स मशीन, तसेच काही बनावट पोलीस क्लिअरन्स सर्टीफीकेट, फिटनेस सटीफीकेट, इन्शुरन्स सर्टीफीकेट इत्यादी) ७,००० रु किं चा एक रिअल मी कंपनीचा अॅण्ड्रॉईड मोबाईल. ३०० / – रु कि चे ०३ बनावट रबरी स्टॅम्प. असा एकुण १,२१,५८० रु किं चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
आरोपी १) राहुल गाँड हा त्याचे इतर साथीदार २) बालाजी गोरख बाबर, वय २३ वर्षे, रा. संदीपनगर, थेरगांव, पुणे ३) तुकाराम अर्जुन मगर, वय ३० वर्षे, रा. गजानन नगर, काळेवाडी फाटा ४) प्रविण दशरथ दळवे वय २५ वर्षे, रा. राक्षे फाटा, चाकण व इतर ०२ हे संगणमत करुन एक ते दोन वर्षापासुन स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करीत होते. त्यांनी आजपर्यंत ७०० ते ८०० गिव्हाईकास बनावट सर्टिफिकेट तसेच कागदपत्रे तयार करुन दिलेली असल्याने त्यांचेविरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुरनं २०६/२०२१ भादंवि कलम ४२० , २५ ९ , २६० , ४६४ , ४६५ , ४६८ , ४७१ , ४७३ , २०१ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यांना अटक करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाच्या तीन टिम तयार करुन वरील आरोपींना रात्री दरम्यान वेगवेगळया ठिकाणावरुन ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी तुकाराम अर्जुन मगर यास सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अंमलदार संतोष बर्गे, पोहबा संदीप गवारी, पोना महेश बारकुले, पोना विष्णु भारती हे त्यास शोधुन ताब्यात घेण्यासाठी पहाटे ०५:०० वा चे सुमारास आरोपीचे मागावर काळेवाडी फाटा येथे येवुन आरोपीची गाडी क्रमांक एमएच १४ एफ सी १६०२ यास हात दाखवुन थांबविले असता वाहनामध्ये चालक सीटवर असलेल्या तुकाराम मगर याला पोलीस स्टाफने आम्ही पोलीस आहोत असे सांगितले. त्यानंतर त्याने तुमचे पोलीस ओळखपत्र दाखवा असे म्हटल्याने पोहवा संतोष बर्गे यांनी पुढे येवुन पोलीस ओळखपत्र दाखविले असता आरोपीने गाडीच्या काचा एकदम जोरात वरती केल्या त्यामध्ये पोहवा संतोष बर्गे यांचा हात अडकल्याने पोहवा संतोष बर्गे यांना १५-२० फुट अंतरावर फरपटत नेवुन जखमी केले.
तसेच गाडीसमोर उभे असलेले पोहवा संदीप गवारी यांचे अंगावर गाडी घालुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेला. त्यानंतर पोलीस स्टाफने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुरनं २०७/२०२१ भादंवि क ३५३,३३२.३०७ , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील दोन्ही गुन्हयाचे तपास वाकड पोलीस करीत आहेत.
















