- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२१) :- पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार “तुळशीराम ऊर्फ बाबु नथुराम पोकळे ” व चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार “ योगेश दिनेश सावंत ” या टोळीवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी पोलीस ठाणे गुरजि.नं. १०७/२०२१ भादवि कलम ३६४, ३६४ (अ), ३०२, २०१, १२० (ब). ४५७, ३८०, ४११, ४१४, ३४ चे तपासामध्ये आरोपी (१) तुळशीराम ऊर्फ बाबु नथुराम पोकळे, वय- ३४ वर्षे, रा. हिना पॅलेस, नढेनगर, फ्लॅट नं. १३, पिंपरी, पुणे (टोळी प्रमुख) २). दिपक धरमवीरसिंग चंडालिया, वय ३४ वर्षे, रा. ए -२५८, एच.ए. कॉलनी, पिंपरी, पुणे. ३) उमेश सुधीर मोरे, वय- २८ वर्षे, रा. नवले निवास, काटे पिंपळे, पिंपळे सौदागर, पुणे. ४) सागर दत्तात्रय पतंगे, वय- २८ वर्षे, रा. मु.पो. कटफळ, ता. बारामती, जि. पुणे. ५) प्रविण नवनाथ सोनवणे, वय- २२ वर्षे, रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे. ६) कपील ग्यानचंद हासवानी, वय -३० वर्षे, रा. सी-७०४, व्दारका नविन पार्क, रहाटणी रोड, पिंपळे सौदागर, पुणे. ७) राकेश राजकुमार हेमनानी, वय- २७ वर्षे, रा. मंगलदिप अपार्टमेन्ट, तपोवन मंदिररोड, पिंपरी, पुणे. ८) प्रभु अडप्या पुजारी, रा. पाटीलनगर, बेकरीजवळ, चिखली पुणे.
यांच्याविरूध्द अपहरण करून खंडणी मागणे, दुखापत, वाहन चोरी, जबरी चोरी, अपहरण करून खुन व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकुण ०९ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत दाखल असल्याचे तसेच वरील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
तसेच दिलीप भोसले. पोलीस निरीक्षक ( गुन्हे ), चिखली पोलीस ठाणे यांनी आनंद भोईटे, पोलीस उप – आयुक्त, परिमंडळ -२ यांचे मार्फतीने चिखली पोलीस ठाणे गु.र नं . ४४७/२०२० भादंवि कलम ३०२, २०१, ३६४, ३६५, ३६८, ५०४, ५०६, १४३, १४३, १४९ म.पो.का क ३७ (१) सह १३५ चे तपासामध्ये आरोपी (१) योगेश दिनेश सावंत, वय -२८ वर्षे रा. इंद्रायणी हौ.सोसा, रुपीनगर, तळवडे, पुणे (टोळी प्रमुख), (२) आकाश उर्फ गुंडया प्रकाश भालेराव, वय -२१ वर्षे रा. चिंचेचा मळा, संतक्रपा हौ. सोसायटी, टॉवर लाईन रोड, त्रिवेणीनगर, पुणे. ( ३ ) रुपेश प्रकाश आखाडे वय २३ वर्षे रा. शिवरकर चौक, त्रिवेणीनगर पुणे. (४) सनि ऊर्फ नकुल अनिल कुचेकर, वय -२५ वर्षे रा. वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे. (५) गौरव रमेश डांगले वय २२ वर्षे रा फ्लॅट नं. ९ रुपाली कॉर्नर बिल्डींग जुना जकातनाका, चिंचवडगाव, पुणे. (६) अर्जुन महादेव गोपाळे, वय २६ वर्षे रा. शिरगाव खळवाडी ता. मावळ जि. पुणे. ७) किरण अरुण लोखंडे, वय -२७ वर्षे रा. हिराण गोपाळे यांचे रुममध्ये शिरगाव ता. मावळ, जि. पुणे. ८) सुदिश सुरेंद्रन सदानंद, वय -२८ वर्षे रा. सी / २३, सुखवाणी प्लाझा, आकुर्डी पुणे. ९) सुचेतन सदाशिव चौधरी, वय -२८ वर्षे रा. वाल्हेकरवाडी चिखली पुणे.
यांचेविरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा करुन दुखापत, दुखापत, गर्दी – मारामारी व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकुण १३ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहर याठिकाणी दाखल आहेत. तसेच वरील सर्व आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने वरील दोन्ही टोळ्यांविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव मा. अपर पोलीस आयुक्त तथा पोलीस उप – महानिरीक्षक साो. पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला होता.
सुधीर हिरेमठ, पोलीस उप – आयुक्त, गुन्हे, व प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे -२ पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी सदर प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून त्रुटींची पूर्तता करून सदरचा प्रस्ताव आदेश पारीत करणे कामी अपरपोलीस आयुक्त तथा पोलीस उप -महानिरीक्षक पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला असता दिनांक ०५/०३/२०२१ रोजी रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त तथा पोलीस उप – महानिरीक्षक, पिंपरी चिंचवड यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ ( १ ) ( i ) ( ii ) . ३ ( ४ ) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.
















