- ट्रान्सपोर्ट कंपनीच्या तीन ट्रकवर दगड मारून नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मार्च. २०२१) :- विशीतील तरुणांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याकडून जबरदस्तीने ८ हजार रूपये काढून घेतले. तसेच, त्याच सोसायटीच्या काचा, सीसीटीव्ही आणि फिर्यादी यांच्या चारचाकीची तोडफोड केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या तीन ट्रकवर दगड मारून त्यांचे नुकसान केले.
शिवसाई पार्क, यशवंतनगर या ठिकाणी शुक्रवारी (दि. ०५) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पाच तरुणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यापैकी आरोपी रोहित मुकिदा पवार (वय १९, रा. भोसरी) व अविनाश नागनाथ माने (वय २०, रा. भोसरी) यांना अटक करण्यात आले आहे. तर, शंकर चौधरी (वय २०, यशवंतनगर, पिंपरी) व आणखी दोन आरोपी यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रामशंकर उदयराज गुप्ता (वय ५५, रा. शिवसाई पार्क सोसायटी, यशवंतनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
















