- नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांना सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मार्च. २०२१) :- पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे दोन्ही नेते आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे या दोघांना सोबत घेवून शहरातील विकासकामे मार्गी लावा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे यांना दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच झाली. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक ॲड. नितीन लांडगे यांची बहुमताने सभापतीपदी निवड झाली.
या पार्श्वभूमीवर ॲड. नितीन लांडगे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, सरचिटणीस विजय फुगे आदी उपस्थित होते.
ॲड. नितीन लांडगे म्हणाले की, शहराचे नेते आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने मला स्थायी समिती सभापतीपदी काम करण्याची संधी दिली आहे. पक्षातील सर्व नगरसेवक आणि दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाने शहरातील विकासकामे मार्गी लावून पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
















