- माजी नगरसेविका अश्विनी चिखले व शहर मनसेचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च. २०२१) :- ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने व माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले (मराठे) यांच्या सहयोगाने प्रभाग क्रमांक १३ व परिसरात आरोग्य विभागाच्या महिलांना गुलाबपुष्प देऊन एक गोड दिवस व्हावा म्हणून केक कापण्यात आला व महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी आढाव, निगडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, नितीन पवार, मनसे प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महांगरे, विद्यार्थी सेनेचे उपविभाग अध्यक्ष रोहित काळभोर, साईनाथ लष्करे, जय सकट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष सोनू दळवी, सागर शिंदे, गणेश वाघमारे, या सर्वांनी महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला डॉक्टर सुरेखा दिवाण, महिला सिस्टर व नर्सेस यांचा मानपान व सत्कार करण्यात आला.
















