- पिं. चिं. ॲड. बार असो. चे माजी अध्यक्ष राजेश पुणेकर यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च. २०२१) :- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष व कार्यकारीणी सदस्य यांचा ॲड. राजेश पुणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी विजयी झालेले ॲड. गोरक्षनाथ झोळ, उपाध्यक्षपदी विजयी झालेले ॲड. पांडुरंग शिनगारे, सचिव महेश टेमगिरे, महिला सचीव ॲड. मोनिका गाढवे यांना पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच कार्यकारिणीमधील अन्य सभासदांना बार कौन्सिल ऑफ इंडिया शिस्तपालन समीतीचे सदस्य. अतिश लांडगे, माजी उपाध्यक्ष ॲड. योगेश थंबा, ॲड. अतुल अडसरे, ॲड. निलेश जगताप, ॲड. मिथुन देवकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड राजेश पुणेकर यांनी पिं.चिं.ॲड. बार असोसिएशनला नवनिर्वाचीत अध्यक्ष ॲड. गोरक्षनाथ झोळ हे अतिशय अनुभवी व कार्यक्षम नेतृत्व मिळाल्याचे सांगितले. तसेच नवनिर्वाचीत अध्यक्ष व कार्यकारिणी हे वकीलांच्या जागेचा प्रश्न, कोर्टाचे जागेचा प्रश्न, दुय्यम निबंधक कार्यालयामधील अडचणी दुर करतील असा विश्वास व्यक्त केला.
ॲड. झोळ यांचा राजकीय व सामाजीक परिचय मोठा असल्याचे ॲड. पुणेकर यांनी सांगितले व त्याचा उपयोग ॲड. झोळ कोर्टाच्या व वकिलांच्या विकासासाठी करून घ्यावा असे सांगितले व नवनिर्वाचित अध्यक्ष व त्यांचे कार्यकारीणीस शुभेच्छा दिल्या. तसेच ८ मार्च रोजी पिंपरी न्यायालयाच्या वर्धापन दिनानिमीत्त व जागतीक महिला दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष ॲड. गोरक्षनाथ झोळ यांनी त्यांना व संपुर्ण कार्यकारीणीस सन्मानीत केल्याबद्दल सर्वाचे आभार मानले व वकीलांचे प्रश्न, कोर्टाचे जागेचा प्रश्न आपण लवकरच सोडविणार असल्याचे सांगितले तसेच यानंतर जेष्ठ विधीज्ञ व अनुभवी विधीज्ञ मंडळीचा सल्ला घेऊन व सर्व वकिलांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कार्यकारिणीमधील सदस्य गणेश शिंदे यांनी तर, माजी अध्यक्ष ॲड राजेश पुणेकर यांनी आभार मानले.
















