- अठरा हजार स्वेअर फुटांचे बांधकाम भुईसपाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी, रावेत, चिंचवडेनगर अशा विविध परिसरात कारवाई सुरू आहे. अठरा हजार स्वेअर फुटांचे बांधकाम भुईसपाट करण्यात आले.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांत अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम सुरू झाली आहे. त्या पाठोपाठ पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्याधिकारी बन्सी गवळी यांनी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिक्रमण विभाग यांचे नियंत्रणाखाली प्राधिकरणाचे जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यावर कारवाई सुरू आहे.
वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, रावेत या भागात नोटिसा देण्याचे काम सुरू केले आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी सर्व्हे नंबर, १२४, १२५, १२६ आणि पाच गुंठे जागेतील सुमारे ८ हजार ८०० फूट आरसीसीसी इमारत जमीनदोस्त केली. तसेच एका गुंठे जागेमधील चार मजली इमारतीचे सुमारे ९५०० चौरसफूट बांधकाम अर्धे पाडले आहे. ही कारवाई करताना तीन पोकलेन, दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर ब्रेकर, पोकलेनच्या माध्यमातून केली.
















