- बेशिस्त ५४१ नागरिकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, तरीही काही नागरिकांकडून निर्बंधांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा बेशिस्त असलेल्या ५४१ नागरिकांवर पिंपरी – चिंचवड पोलिसांनी रविवारी कारवाई केली.
शहरातील करोना पॉझिटव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. महिनाभरापूर्वी शहरात अवघे ७५ रुग्ण आढळून येत होते. मात्र, त्यानंतर नागरिकांची बेफिकिरी वाढली. मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटायझर तसेच इतर सुरक्षा साधनांचा वापर करण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
यात एमआयडीसी भोसरी (३०), भोसरी (११), पिंपरी (३१), निगडी (४८), आळंदी ८, चाकण (२०), दिधी (१९), म्हाळुगे चौकी (८३), सांगवी (२१), वाकड (४४), हिंजवडी (१४१), देहूरोड (१५), तळेगाव दाभाडे (१७), तळेगाव एमआयडीसी (१), चिखली (३७), रावेत चौकी (११), शिरगाव चौकी (४) या पोलीस ठाण्यांकडून कारवाई करण्यात आली.
















