न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ‘ ग ‘ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २३ व २४ थेरगांव येथे आज बुधवारी (दि. १०) रोजी रस्ता रुंदीकरणात येणारी अनधिकृत आर.सी.सी. वीट बांधकाम व पत्राशेड बांधकामावर कारवाई केली.
या कारवाईमध्ये थेरगांव येथील १६००४.०० चौ.फुट, असलेले १८ अनधिकृत आर.सी.सी. वीट बांधकाम व पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी अतिरिक्त आयुक्त २ अजित पवार, सहशहर अभियंता मकरंद निकम व संबधित प्रभागाचे कार्यकारी अभियंता सुनील भाम्बानी यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता नितीन निंबाळकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चंद्रकांत पाटील यांचे पथकाने केली.
या कारवाईसाठी २० मनपा पोलिस, ०२ जे.सी.बी, ०२ ट्रक्टर ब्रेकर, ०१ ट्रक, १५ मजूर व १० मनपा कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले.












