२ न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. १० मार्च) रोजी ६३३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – भोसरी (वय ५४ व ५९ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११०७०३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०३५१७ वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८६३ जणांचा मृत्यू झालेला आहे. अ – ६७, ब – ९०, क – ८२, ड – ११२, इ – ७१, फ – ९१, ग – ४१, ह – ७१, एकुण – ६३३ अशी आहेत.












