न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मार्च २०२१) :- आपल्याला बँकांची काही महत्वाची कामे करावयाची असल्यास ती शुक्रवारीच करावी लागणार आहेत. कारण आज गुरुवारपासून पाच दिवस बँका बंद राहणार आहेत.
गुरुवार दि. ११ रोजी महाशिवरात्र असल्याने बँकांना सुटी आहे. त्यानंतर दुसरा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुटी असेल. सोमवार आणि मंगळवार दोन दिवस बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे शुक्रवारचा अपवाद वगळता पाच दिवस बँका बंद राहणार आहेत.