- मंदिर बंदच्या निर्णयामुळे दर्शनाअभावी भाविकांचा हिरमोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मार्च २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंदिराच्या बाहेर तशा सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा भाविकांना दर्शन घेता येणार नाही.
दरवर्षी शहरातील शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पहाटेपासूनच शिवमंदिरात दर्शन घेण्यासाठी रांगा लागतात. मात्र, शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पुन्हा गर्दी होण्यावर निर्बंध घालण्यासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.