न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मार्च २०२१) :- महाशिवरात्रीनिमित्त चिखली, मोरेवस्ती येथील स्वामी विवेकानंद सोसायटीमधील शब्दब्रम्ह संस्थेच्या योगेश्वर केदारनाथ सर्वधर्मसमभाव शिवमंदिराच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे युवा नेते पांडुरंग साने यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक प्रभाकर चव्हाण, योगशिक्षक दत्तात्रय महापुरे, सतीश सावंत, ज्ञानेश्वर कुंजीर, संस्थेच्या स्मिता जाधव, मेघना आंब्रे, स्वाती सावंत, आश्लेषा चाळके व अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.
संस्थेच्या विद्यार्थी पेटीवर भजन व भक्तिगीते सादर करीत वातावरण भारावून टाकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घेत व मोजक्या कार्यकर्त्यांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रभाकर बळवंत चव्हाण, दशरथ सपकाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.
















