- अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचा उपक्रम..
- प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे यांची प्रमुख उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ जून २०२६) :- चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने २ हजारांहून अधिक महिलांसाठी नुकताच ‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. महिलांना दर्जेदार मनोरंजनासह सामाजिक आशय असलेला चित्रपट अनुभवता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे, भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी ‘शो’ ला उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले होते.
शैलजाताई मोरे संवाद साधताना म्हणाल्या, अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविले जात असून, महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष चित्रपट प्रदर्शनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित सर्व महिलांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते.
अनुप मोरे म्हणाले, युवा, महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी प्रभागात नेहमीच सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यास येत असतात. आजही चित्रपट पाहण्यासाठी प्रभागातील विविध भागांतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान महिलांनी फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
















