न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ जून २०२६) :- चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इान्स्टिट्यूटच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्याधुनिक ‘स्विच रायफल शूटिंग रेंज आणि पिस्टल प्रशिक्षण सुविधा’चे औपचारिक उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व शास्त्रीय मार्गदर्शनाखाली नेमबाजी क्रीडा प्रकार शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या सुविधेचे उद्घाटन प्रतिभा ग्रुप ऑफ इान्स्टिट्यूटच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा यांच्या हस्ते आणि प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ .वृंदा जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सोहळ्याला संस्थेच्या संचालिका डॉ . तेजल शहा , शाळेच्या उपप्राचार्या लिजा सोजू , समन्वयीका गुलनाज खान, प्रशिक्षक विजय झुंजारे , राष्ट्रीय खेळाडू प्रमिला कांबळे , डायनॅमिक स्पोर्टस फाउंडेशनचे संस्थापक रमेश वराडे , ज्योती वराडे , किर्ती मिसळ , प्रतीक पांचाळ, भुषण पाटील , आर्या , प्राध्यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही अत्याधुनिक शूटिंग रेंज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या दूरद्दष्टीतून व मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली आहे. प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण देण्याविषयी योग्य सुचना व भावी वाटचालीस शुभेच्छा त्यानी दिल्या आहेत.
शालेय विद्यार्थाना पिंपरी चिंचवड रायफल शूटिंग चे प्रशिक्षक विजय रणझुंजारे याच्याकडून दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ. भूपाली शहा म्हणाल्या, नेमबाजी प्रशिक्षणातून विद्यार्थ्याच्या दैनदीन अभ्यासाबरोबरच त्याचे व्यक्तिमत्व धडण्यास मदत होईल . या प्रशिक्षण सुविधामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, शिस्त, अचूकता, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती वाढविण्यास मदत करेल. क्रीडा हे केवळ शारीरिक आरोग्यासाठी नसून मानसिक दृढतेसाठीही अत्यावश्यक आहे.”
शाळेच्या प्राचार्या डॉ. वृंदा जोशी यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धेच्या युगात येथे शिक्षण घेणारे शालेय विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता क्रीडा, कला व इतर क्षेत्रात प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ही शूटिंग रेंज त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.” संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, संचालिका डॉ . तेजल शहा यांनी शाळा प्रशासनाला दिलेल्या या रेंजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे वापरली गेली असून, प्रत्येक सत्रापूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांचे पालन करून प्रशिक्षण चे नियम प्रत्येकाला बंधनकारक असेल. तसेच त्याची सुरक्षितताही महत्वाची असेल. ही सुविधा शालेय विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.या उपक्रमामुळे प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलने क्रीडा क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.















