न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२१) :- भारताचे माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्त आज सकाळी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आणि स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.
वल्लभनगर तसेच पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास देखील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आणि स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वल्लभनगर येथील कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुलक्षणा धर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुलक्षणा धर, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले आदी उपस्थित होते.
















