न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. १२ मार्च) रोजी ८५५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – मोशी (७९ वर्षे), पिंपळे गुरव (६५ वर्षे), पिंपळे सौदागर (६५ वर्षे), फुगेवाडी ( ७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११२३७० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०४३६६ वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८७० जणांचा मृत्यू झालेला आहे. प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ – १२८, ब – १६९, क – ९९, ड – १२२, इ – ९८, फ – ९८, ग – ८०, ह – ६१ एकुण – ८५५ अशी आहे.
















