न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त यमुनानगर टीबी युनिट अंतर्गत, यमुनानगर रुग्णालय, ओटास्किम निगडी या ठीकाणी सोशल डिस्टस नियमाचे पालन करून जेष्ठ नागरिक क्षयरोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या ठीकाणी एकूण एकशे दोन (१०२) जेष्ठ महिला व पुरुष उपस्थित होते.
सर्व उपस्थिताना डॉ. भोईर संध्या ( MOTU ), डॉ. तायडे धीरज (MO) यांनी क्षयरोगाविषयी लक्षणे, निदान आणि उपचार याविषयी माहिती दिली. चंद्रशेखर सरवदे (STS) यांनी आहार व व्यायाम या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मनीषा काळे (STLS), संजय भवारी (MPW) हे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना निहाल सय्यद (TBHV) यांनी तर थीम अर्चना नटवे (TBHV) यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अति, आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर आणि शहर क्षयरोग वैद्यकिय अधिकारी डॉ. अंजली डोणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
















